मत्तय 21:9-12
मत्तय 21:9-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!” जेव्हा येशूने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर गजबजून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?” जमावाने उत्तर दिले, “हा गालील प्रांतातील नासरेथ नगरातून आलेला, येशू संदेष्टा आहे.” मग येशूने देवाच्या भवनात प्रवेश केला. तेथे जे लोक विक्री व खरेदी करीत होते त्या सर्वांना बाहेर घालवून दिले. पैश्याचा व्यवहार करणाऱ्यांची मेजे आणि कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी उलथून टाकल्या.
मत्तय 21:9-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग जमावातील जे लोक त्यांच्यापुढे गेलेले आणि जे त्यांच्यामागून चालले, ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!” येशूंनी यरुशलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा सर्व शहर जागे झाले आणि त्यांनी विचारले, “हा कोण आहे?” “हे येशू आहेत!” गर्दीतील लोकांनी उत्तर दिले, “गालीलाच्या नासरेथहून आलेले संदेष्टा आहेत.” येशू मंदिराच्या अंगणात गेले आणि तिथे खरेदीविक्री करणार्या सर्वांना त्यांनी बाहेर घालवून दिले. पैशाची अदलाबदल करणार्यांचे मेज आणि कबुतरे विकणार्यांची आसने त्यांनी उधळून लावली.
मत्तय 21:9-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना!’ ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित!’ ‘ऊर्ध्वलोकी होसान्ना!’ तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, “हा कोण?” लोकसमुदाय म्हणाले, “गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा आहे.” नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रयविक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्यांच्या बैठका पालथ्या केल्या.
मत्तय 21:9-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! दावीदपुत्राचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! ऊर्ध्वलोकी होसान्ना!” तो यरुशलेममध्ये आल्यावर सर्व नगर गजबजले. लोक म्हणाले, “हा कोण आहे?” लोकसमुदाय म्हणाला, “हा येशू आहे - गालीलमधील नासरेथहून आलेला संदेष्टा.” येशू मंदिरात गेला व मंदिरात खरेदीविक्री करणाऱ्यांना त्याने बाहेर घालवून दिले आणि सराफाचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांची आसने उलथून टाकली