मत्तय 21:6-9
मत्तय 21:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. शिष्यांनी गाढवी व शिंगरु आणून त्यांनी त्यावर आपले अंगरखे घातले आणि येशू त्यावर बसला. पुष्कळ लोकांनी आपले अंगरखे वाटेवर अंथरले. दुसऱ्यांनी झाडांच्या फांद्या तोडल्या आणि त्या रस्त्यावर पसरल्या. येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!”
मत्तय 21:6-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शिष्य गेले आणि येशूंनी त्यांना सांगितल्याप्रमाणेच त्यांनी केले. त्यांनी गाढवी व शिंगरू आणली आणि त्यांचे वस्त्रे गाढवी व शिंगरूच्या पाठीवर टाकले मग येशू त्यावर बसले. गर्दीतील काही लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले; तर इतर काहींनी झाडांच्या डाहळ्या तोडून रस्त्यावर पसरल्या. मग जमावातील जे लोक त्यांच्यापुढे गेलेले आणि जे त्यांच्यामागून चालले, ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “दावीदाच्या पुत्राला होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो.” “सर्वोच्च स्वर्गात होसान्ना!”
मत्तय 21:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले; गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्यांच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; काही झाडांच्या डाहळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना!’ ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित!’ ‘ऊर्ध्वलोकी होसान्ना!’
मत्तय 21:6-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शिष्य गेले आणि त्यांनी येशूच्या सांगण्याप्रमाणे केले. त्यांनी गाढवी व शिंगरू आणून त्यांवर आपली वस्त्रे पसरली व येशू त्यांच्यावर बसला. लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी डाहळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या. पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! दावीदपुत्राचा गौरव असो! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! ऊर्ध्वलोकी होसान्ना!”