मत्तय 21:2-4
मत्तय 21:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यांना असे सांगितले की, “तुम्ही समोरच्या गावात जा आणि लागलीच एक गाढवी बांधलेली व तिच्याबरोबर एक शिंगरु असे तुम्हास आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे घेऊन या. जर कोणी तुम्हास काही विचारले, तर त्यास सांगा की, प्रभूला यांची गरज आहे, तो ती लगेच माझ्याकडे पाठवील.” हे यासाठी घडले की संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावेः ते असे की
मत्तय 21:2-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांना म्हणाले, “समोरच्या गावात जा, तिथे पोहोचताच, तुम्हाला एक गाढवी दिसेल, तिच्याजवळ शिंगरू बांधून ठेवलेले असेल; त्यांना सोडून माझ्याकडे आणा. कोणी तुम्हाला विचारले, तर त्यांना एवढेच सांगा, प्रभूला त्याची गरज आहे आणि ते लागलीच पाठवून देतील.” संदेष्ट्याने केलेले भविष्यकथन पूर्ण व्हावे म्हणून असे झाले
मत्तय 21:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हांला आढळतील; ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हांला काही म्हटले, तर ‘प्रभूला ह्यांची गरज आहे,’ असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.” संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले; ते असे की
मत्तय 21:2-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“तुम्ही समोरच्या गावात जा. तेथे लगेच तुम्हांला एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू बांधलेले आढळेल. त्यांना सोडून माझ्याकडे आणा. तुम्हांला कोणी काही म्हटले तर ‘प्रभूला ह्यांची गरज आहे’, असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.” संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे