मत्तय 20:30-33
मत्तय 20:30-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा पाहा, वाटेवर बसलेले दोन आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, “हे प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.” त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले; तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, “प्रभो, दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया करा.” येशूने उभे राहून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करू? तुमची काय इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, आमचे डोळे उघडावे.”
मत्तय 20:30-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.” जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.” मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभूजी, आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे.”
मत्तय 20:30-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दोन आंधळी माणसे रस्त्याच्या कडेला बसली होती. येशू आपल्या बाजूने येत आहेत, हे त्यांनी ऐकले, तेव्हा ते मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दावीदाचे पुत्र! आम्हावर दया करा!” गर्दीतील लोकांनी त्यांना धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, तर ते अधिक मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “अहो प्रभू, दावीदाचे, पुत्र, आम्हावर दया करा!” येशू थांबले आणि त्यांनी आंधळ्यांना बोलाविले व ते म्हणाले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” “प्रभूजी,” त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला आमची दृष्टी यावी.”
मत्तय 20:30-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा येशू जवळून जात आहे, हे ऐकून रस्त्याच्या कडेला बसलेले दोन आंधळे ओरडून म्हणाले, “प्रभो, दावीदपुत्रा, आमच्यावर दया करा.” त्यांनी गप्प राहावे म्हणून लोकांनी त्यांना धमकावले, परंतु ते अधिकच ओरडून म्हणाले, “प्रभो, दावीदपुत्रा, आमच्यावर दया करा.” येशूने थांबून त्यांना बोलावून म्हटले, “मी तुमच्यासाठी काय करावे, अशी तुमची इच्छा आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभो, आम्हांला दृष्टी प्राप्त व्हावी.”