मत्तय 20:22-23
मत्तय 20:22-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो तिला म्हणाला, “तू काय मागत आहेस ते तुला समजत नाही! जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हास पिता येईल काय?” ते म्हणाले, होय, “पिता येईल!” येशू त्याना म्हणाला, “तुम्ही खरोखर माझ्या प्याल्यातून प्याल खरे, पण माझ्या उजव्या आणि डाव्या हाताला बसण्याचा मान कोणाला देणे हे ठरविणारा मी नाही, तर माझ्या पित्याने तो मान कोणाला द्यायचा हे ठरवले आहे.”
मत्तय 20:22-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यावर येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे, तो तुम्ही पिऊ शकाल काय?” त्यांनी उत्तर दिले, “आम्ही तो पिऊ शकू!” “त्या प्याल्यातून तुम्ही प्याल यात शंका नाही,” येशूंनी त्यांना म्हटले, “परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा माझ्या पित्याने ज्यांच्यासाठी तयार केल्या आहेत, त्यांनाच मिळतील.”
मत्तय 20:22-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशू म्हणाला, “तुम्ही काय मागता हे तुम्हांला समजत नाही; जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हांला पिता येईल काय? [आणि जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घेववेल काय?]” ते त्याला म्हणाले, “आम्हांला शक्य आहे.” त्याने त्यांना म्हटले, “माझा प्याला तुम्ही प्याल खरा, [व जो बाप्तिस्मा मला घ्यायचा आहे तो घ्याल,] पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे.”
मत्तय 20:22-23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू म्हणाला, “तुम्ही काय मागत आहात, हे तुम्हांला समजत नाही. जो प्याला मला प्राशन केला पाहिजे, तो तुम्ही पिऊ शकाल का? जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे, तो तुम्ही घेऊ शकाल का?” ते त्याला म्हणाले, “आम्ही तसे करू शकू.” त्याने त्यांना म्हटले, “माझा प्याला तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घ्याल, हे खरे, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसू देणे माझ्या हाती नाही. तर त्या जागा ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने सिद्ध केल्या आहेत, त्यांना मिळतील.”