मत्तय 2:10-11
मत्तय 2:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो तारा पाहून ज्ञानी लोकांस अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली.
मत्तय 2:10-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो तारा पाहून त्यांना फार आनंद झाला. ज्या घरात बालक व त्याची आई मरीया होती, तेथे ते गेले आणि त्यांनी दंडवत घालून त्याला नमन केले. नंतर त्यांनी आपले नजराणे उघडले आणि बालकाला सोने, ऊद व गंधरस ही अर्पण केली.
मत्तय 2:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला; नंतर ते त्या घरात गेले तेव्हा तो बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून ‘सोने, ऊद व गंधरस’ ही ‘दाने’ त्याला अर्पण केली.
मत्तय 2:10-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो तारा त्यांना दिसला तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या घरात गेल्यावर ते बाळ त्याची आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिले. त्यांनी पाया पडून त्याची आराधना केली. त्यांच्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ह्या भेटवस्तू त्यांनी त्याला अर्पण केल्या.