YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 19:8-12

मत्तय 19:8-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला आपल्या बायका टाकू दिल्या; तरी सुरुवातीपासून असे नव्हते. मी तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो; [आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो.]” शिष्य त्याला म्हणाले, “बायकोच्या बाबतीत पुरुषाची गोष्ट अशी असली तर लग्न न केलेले बरे.” तो त्यांना म्हणाला, “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत; पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात. कारण आईच्या उदरी जन्मलेले असे नपुंसक आहेत, माणसांनी केलेले असेही नपुंसक आहेत, आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणांस नपुंसक करून घेतले असे नपुंसक आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने स्वीकारावे.”

सामायिक करा
मत्तय 19 वाचा

मत्तय 19:8-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशूने उत्तर दिले, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या स्त्रिया सोडून देण्याची मोकळीक दिली. पण सुरुवातीला सूटपत्र देण्याची मोकळीक नव्हती. मी तुम्हास सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सूटपत्र देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय.” मग त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “जर पती व पत्नीमधील परिस्थिति अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल.” येशूने उत्तर दिले, “अशी शिकवण स्वीकारणे प्रत्येकाला शक्य होणार नाही. परंतु ज्यांना ही शिकवण स्वीकारण्याची मोकळीक दिली आहे तेच घेतील कारण आईच्या उदरातून जन्मताच नपुसंक असे आहेत व मनुष्यांनी केले असे नपुसंक आहेत आणि स्वर्गाच्या राज्यासाठी ज्यांनी आपणास नपुसंक करून घेतले आहेत. ज्याला हे स्वीकारता येते त्याने, स्वीकारावे.”

सामायिक करा
मत्तय 19 वाचा

मत्तय 19:8-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यावर येशूंनी उत्तर दिले, “कारण तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने तुम्हाला आज्ञा दिली. परंतु मुळात परमेश्वराची तशी इच्छा नव्हती. मी तुम्हाला सांगतो, व्यभिचाराच्या कारणाशिवाय जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.” येशूंचे शिष्य त्यांना म्हणाले, “जर अशी परिस्थिती पती आणि पत्नीमध्ये असेल, तर मग लग्न न केलेले बरे.” येशू म्हणाले, “हे शिक्षण प्रत्येकाला स्वीकारता येईल असे नाही; पण ज्यांना तसे दान दिले आहे, त्यानांच ते स्वीकारता येईल. कारण काहीजण जन्मतःच नपुंसक असतात आणि काही जणांना मनुष्यांनीच तसे केलेले असते; आणि काहींनी स्वर्गाच्या राज्यासाठी ही जीवनपद्धती स्वीकारली आहे. ज्यांना ही स्वीकारावयाची आहे, त्याने ती स्वीकारावी.”

सामायिक करा
मत्तय 19 वाचा

मत्तय 19:8-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हांला तुमच्या बायका सोडून देण्याची परवानगी दिली, पण प्रारंभी तसे नव्हते. मी तुम्हांला सांगतो, जो कोणी स्वतःच्या पत्नीला विवाहबाह्य संबंधाच्या कारणाशिवाय सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो व्यभिचार करतो [आणि जो कोणी अशा सोडून दिलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो, तोही व्यभिचार करतो.]” शिष्य त्याला म्हणाले, “पत्नीच्या बाबतीत पुरुषाची जबाबदारी अशी असली तर लग्न न केलेले बरे.” तो त्यांना म्हणाला, “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत, पण ज्यांच्याकरता ते देण्यात आले आहे, तेच ते स्वीकारू शकतात; कारण लग्न न करण्याची विविध कारणे आहेतः काही जणांची जन्मतःच अशी जडणघडण झालेली असते की, ते लग्न करू शकत नाहीत; काही जणांना माणसांनी तसे बदलले म्हणून लग्न करता येत नाही आणि इतर काही जण स्वर्गाच्या राज्यासाठी लग्न करत नाहीत. ज्याला हे स्वीकारता येते, त्याने स्वीकारावे.”

सामायिक करा
मत्तय 19 वाचा