मत्तय 18:34-35
मत्तय 18:34-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मालक फार संतापला, शिक्षा म्हणून मालकाने पहिल्या चाकराला तुरूंगात टाकले आणि त्याने सर्व कर्ज फेडीपर्यंत त्यास तुरूंगातून सोडले नाही. “जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हास क्षमा करणार नाही.”
मत्तय 18:34-35 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग संतप्त झालेल्या प्रभूने त्या दुष्ट मनुष्याला, तो सर्व कर्ज फेडीपर्यंत तुरुंगामध्ये कोंडून ठेवले. “जर तुम्ही तुमच्या भावाची व बहिणीची मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गीय पिताही याचप्रकारे तुम्हा प्रत्येकाला वागवेल.”
मत्तय 18:34-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणार्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला त्यांच्या अपराधांची मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.”
मत्तय 18:34-35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणि त्याचा धनी त्याच्यावर रागावला व त्याचे कर्ज फिटेपर्यंत त्याने त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती तुरुंगात पाठवले. म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण स्वतःच्या भावाला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही तुम्हांला क्षमा करणार नाही.”