YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 18:28-33

मत्तय 18:28-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर त्याच चाकराचे काही शंभर चांदीचे नाणे देणे लागत असलेला दुसरा एक चाकर पहिल्या चाकराला भेटला. त्याने त्या दुसऱ्या चाकराचा गळा पकडला आणि तो त्यास म्हणाला, तू माझे जे काही पैसे देणे लागतोस ते सर्व आताच्या आता दे. परंतु दुसरा चाकर गुडघे टेकून गयावया करीत म्हणाला, मला थोडी सवलत द्या. जे काही पैसे मी तुम्हास देणे लागतो ते परत करीन. पण पहिल्या चाकराने दुसऱ्या चाकराला सांभाळून घेण्यास साफ नकार दिला. उलट तो गेला आणि त्याने त्यास तुरूंगात टाकले. तेथे त्यास त्याचे कर्ज फिटेपर्यंत रहावे लागणार होते. घडलेला हा प्रकार जेव्हा दुसऱ्या चाकरांनी पाहिला तेव्हा ते फार दुःखी झाले, तेव्हा ते गेले आणि त्यांनी जे सर्व घडले होते ते मालकाला सांगितले. तेव्हा पहिल्या चाकराच्या मालकाने त्यास बोलावले व तो त्यास म्हणाला, “दुष्टा, तू माझे कितीतरी देणे लागत होतास, परंतु मी तुझे देणे माफ करावे अशी विनंती तू मला केलीस तेव्हा मी तुझे सर्व कर्ज माफ केले. म्हणून तू तुझ्याबरोबरच्या चाकरालाही तशीच दया दाखवायची होतीस?”

सामायिक करा
मत्तय 18 वाचा

मत्तय 18:28-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“पण तो नोकर बाहेर गेला आणि ज्याच्याकडे त्याचे शंभर दिनारचे कर्ज होते तो सोबतीचा नोकर त्याला भेटला, त्याने त्याची मानगुट पकडली आणि ताबडतोब आपले कर्ज देण्याची त्याने मागणी केली. “त्याचा कर्जदार त्याच्यापुढे पालथा पडला व विनंती करू लागला, ‘थोडा धीर धरा, मी सर्व कर्ज फेडीन.’ “पण तो थांबावयास तयार नव्हता. त्याने त्या मनुष्याला अटक करवून तो पैसे फेडेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले. जेव्हा इतर नोकरांनी हे पाहिले, तेव्हा ते क्रोधाने भरून प्रभूकडे गेले आणि काय घडले हे सर्व त्यांनी राजाला सांगितले.” तेव्हा प्रभूने ज्या नोकराला क्षमा केली होती, त्या नोकराला बोलाविले. राजा त्याला म्हणाला, “अरे दुष्ट माणसा, मी तुझे सर्व कर्ज माफ केले, कारण तू मला तशी विनंती केलीस; ज्याप्रमाणे मी तुझ्यावर दया केली त्याप्रमाणे तू त्याच्यावर दया करू नये काय?

सामायिक करा
मत्तय 18 वाचा

मत्तय 18:28-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला, त्याच्याकडे त्याचे शंभर रुपये येणे होते; तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, ‘तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक.’ ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, ‘मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन.’ पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दु:खी झाले आणि त्यांनी येऊन सर्वकाही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, ‘अरे दुष्ट दासा! तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते; मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’

सामायिक करा
मत्तय 18 वाचा

मत्तय 18:28-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तोच दास बाहेर गेल्यावर त्याला त्याच्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडून त्याचे थोडे कर्ज येणे होते. तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, “तुझ्याकडून माझे येणे आहे, ते देऊन टाक.’ त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, “मला समजून घे म्हणजे मी तुझे कर्ज फेडेन.’ पण त्याचे न ऐकता त्याने सोबतीच्या दासाला कर्ज फेडेपर्यंत तुरुंगात टाकले. घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे इतर दास अतिशय अस्वस्थ झाले. त्यांनी ते वृत्त त्यांच्या धन्याला सांगितले. त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, “अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी तुझे सर्व कर्ज माफ केले. मी जशी तुझ्यावर दया केली, तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’

सामायिक करा
मत्तय 18 वाचा