मत्तय 17:3-4
मत्तय 17:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याशी बोलत असताना त्यांना दिसले. पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, येथे असणे हे आपणासाठी बरे आहे. आपली इच्छा असेल तर मी येथे तीन मंडप करतो, एक आपल्यासाठी एक मोशेसाठी व एक एलीयासाठी.”
मत्तय 17:3-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचवेळी मोशे आणि एलीया तेथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले. तेव्हा पेत्र येशूंना म्हणाला, “प्रभुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल. आपली इच्छा असेल, तर मी येथे तीन मंडप उभारेन एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयासाठी.”
मत्तय 17:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, “प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे तीन मंडप करतो; आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलीयासाठी एक.”
मत्तय 17:3-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा पाहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. पेत्र म्हणाला, “गुरुवर्य, आपण येथे आहोत, हे किती चांगले आहे! आपली इच्छा असल्यास मी येथे तीन मंडप उभारतो - आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक.”