YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 17:17-20

मत्तय 17:17-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासू व विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्यास माझ्याकडे आणा.” येशूने त्या भूताला धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हास ते का काढता आले नाही?” तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला येथून निघून तेथे जा, असे तुम्ही म्हटला तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.”

सामायिक करा
मत्तय 17 वाचा

मत्तय 17:17-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशूंनी उत्तर दिले, “हे विश्वासहीन व दुष्ट पिढी, आणखी किती काळ मी तुमच्याबरोबर राहिले पाहिजे? आणखी किती काळ मी सहन करू? त्या मुलाला माझ्याकडे आणा.” मग येशूंनी त्या मुलामधील दुरात्म्याला धमकावून घालवून दिले व त्या क्षणापासून तो मुलगा बरा झाला. मग येशूंच्या शिष्यांनी त्यांच्याकडे एकांतात येऊन त्यांना विचारले, “त्याला आम्ही का काढू शकलो नाही?” येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या अल्पविश्वासामुळे,” मी तुम्हाला सत्य सांगतो, तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला आणि या डोंगराला तू इथून पलीकडे सरक, असे तुम्ही म्हणाला, तरी तो दूर सरकेल. तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य होणार नाही.

सामायिक करा
मत्तय 17 वाचा

मत्तय 17:17-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा येशूने उत्तर दिले, “अरेरे, हे विश्वासहीन व कुटिल पिढी! मी कोठवर तुमच्याबरोबर राहावे? कोठवर तुमचे सोसावे? त्याला येथे माझ्याजवळ आणा.” नंतर येशूने भुताला दटावले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकान्ती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हांला ते का काढता आले नाही?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे; कारण मी तुम्हांला खचीत सांगतो की, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे सरक’ असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही.

सामायिक करा
मत्तय 17 वाचा

मत्तय 17:17-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशूने उत्तर दिले, “अहो विश्वासहीन व चुकलेल्या लोकांनो, मी कुठवर तुमच्याबरोबर असणार? कुठवर तुम्हांला समजून घेणार? त्याला येथे माझ्याजवळ आणा.” येशूने भुताला निघून जाण्याचा हुकूम सोडताच ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. त्यानंतर ते एकटे असताना शिष्यांनी येशूला विचारले, “आम्हांला ते का काढता आले नाही?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे जा’, असे म्हटल्यास तो जाईल. तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही.

सामायिक करा
मत्तय 17 वाचा