मत्तय 16:25-26
मत्तय 16:25-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळवील. जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल?
मत्तय 16:25-26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण जो कोणी आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. कोणी सर्व जग मिळविले आणि आपला आत्मा गमविला तर त्यातून काय चांगले निष्पन्न होणार? आपल्या आत्म्याच्या मोबदल्यात मनुष्याला दुसरे काही देता येईल का?
मत्तय 16:25-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल. मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपला जीव गमावला तर त्याला काय लाभ? अथवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देणार?
मत्तय 16:25-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो कोणी स्वतःचा जीव वाचवू पाहील, तो त्याच्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता स्वतःच्या जिवाला मुकेल तो त्याच्या जिवाला वाचवील. कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?