YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 16:15-19

मत्तय 16:15-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.” येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले. आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”

सामायिक करा
मत्तय 16 वाचा

मत्तय 16:15-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“परंतु तुमचे मत काय?” येशूंनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही ख्रिस्त, जिवंत परमेश्वराचे पुत्र आहा.” येशूंनी उत्तर दिले, “योनाच्या पुत्रा शिमोना, तू धन्य आहेस, हे तुला मांस किंवा रक्त यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गीय पित्याने प्रकट केले आहे आणि मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी उभारीन; तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचा विजय होणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन; पृथ्वीवर जे काही तू बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”

सामायिक करा
मत्तय 16 वाचा

मत्तय 16:15-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तो त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात.” येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”

सामायिक करा
मत्तय 16 वाचा

मत्तय 16:15-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तो त्यांना म्हणाला, “पण मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” शिमोन पेत्राने उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात, जिवंत देवाचा पुत्र.” येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, तू धन्य आहेस; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी माझी मंडळी स्थापन करीन व तिच्यापुढे प्रत्यक्ष मृत्यूलोकाचेदेखील काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन. पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”

सामायिक करा
मत्तय 16 वाचा