मलाखी 3:2-4
मलाखी 3:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे; रुपे गाळून शुद्ध करणार्यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांना शुद्ध करील; त्यांना सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते नीतिमत्तेने परमेश्वराला बली अर्पण करतील. पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षांप्रमाणे यहूदा व यरुशलेम ह्यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल.
मलाखी 3:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण टिकून राहणार? आणि जेव्हा तो दिसेल तेव्हा कोण उभा राहिल? कारण तो शुद्धकरणाऱ्या अग्नीसारखा आणि परीटाच्या खारासारखा आहे. आणि तो चांदी गाळणारा व स्वच्छ करणारा असा बनेल, आणि तो लेवीच्या संतानास शुद्ध करेल. तो त्यांना सोन्याप्रमाणे आणि चांदीप्रमाणे शुध्द करेल आणि ते न्यायीपणाने परमेश्वरास अर्पण करतील. तेव्हा जसे पुरातन दिवसात आणि प्राचीन वर्षात तसे यरूशलेम व यहूदाची अर्पणे परमेश्वरास सुखकारक असतील.
मलाखी 3:2-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण त्यांच्या येण्याचा दिवस कोण सहन करू शकेल? त्यांच्या आगमनास कोण सामोरा जाऊ शकेल? कारण तो मौल्यवान धातू शुद्ध करणार्या धगधगत्या अग्नीसारखा आहे आणि मलीन वस्त्रे धुणाऱ्या साबणासारखा असेल. रुपे शुद्ध करणार्यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील, मग पूर्वीच्या दिवसाप्रमाणे आणि गतवर्षासारखे पुन्हा एकदा यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी आणलेली अर्पणे याहवेहस मान्य होतील.