मलाखी 2:13-15
मलाखी 2:13-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणखी तुम्ही परमेश्वराची वेदी आसवांनी, रडण्यांनी, उसासे टाकून झाकून टाकता, म्हणून तो अर्पण मान्य करत नाही आणि ते तुमच्या हातातून संतोषाने स्विकारत नाही. तुम्ही म्हणता, “असे का नाही?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारूण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षीदार आहे. ती तर तुझी सहचारिणी असून व तुझ्या कराराची पत्नी असून तिच्याशी तू विश्वासघाताने वागला आहेस. आणि त्याच्या जवळ आत्म्याचे शेष होते तरी त्याने एक केले नाही काय? आणि त्याने तुम्हास एक का केले? कारण तो ईश्वरीय संततीची आशा बाळगत होता. म्हणून तुम्ही आपल्या आत्म्याचे रक्षण करा, आणि कोणीही आपल्या तरूणपणाच्या पत्नी सोबत विश्वासघात करू नये.
मलाखी 2:13-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तसेच आसवे गाळणे, रडणे व उसासे टाकणे ह्यांनी परमेश्वराच्या वेदीला तुम्ही इतके झाकून टाकले आहे की तो यज्ञार्पणाकडे ढुंकून पाहत नाही; तुमच्या हातून ते आवडीने घेत नाही. तुम्ही म्हणता “असे का?” कारण तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीमध्ये परमेश्वर साक्षी आहे; ती तर तुझी सहचारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिच्याबरोबर तू विश्वासघाताने वागला आहेस. ज्याच्या ठायी आत्म्याचा थोडातरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही; देवाला अनुसरणार्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्याकरता आपल्या आत्म्याला जपावे; व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये.