लूक 9:43-45
लूक 9:43-45 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले. येशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्चर्य करत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा; कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.” ही गोष्ट त्यांना समजली नाही; ती त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून ती गुप्त ठेवण्यात आली होती; आणि ह्या गोष्टीविषयी त्याला विचारायला ते भीत होते.
लूक 9:43-45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे.” परंतु हे बोलणे त्यांना समजले नाही व त्यांना ते समजू नये म्हणून ते त्यांच्यापासून गुप्त राखलेले होते; आणि ते या बोलण्याविषयी त्यास विचारायला भीत होते.
लूक 9:43-45 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वराच्या शक्तीचे हे प्रात्यक्षिक पाहून लोक आश्चर्यचकित झाले. येशू करीत असलेल्या चमत्कारांच्या गोष्टींविषयी लोक आश्चर्य व्यक्त करीत असतानाच, येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐका: मानवपुत्राला, मनुष्यांच्या हाती धरून दिले जाणार आहे.” परंतु ते काय म्हणतात हे त्यांना समजले नाही. त्याचे आकलन होऊ नये म्हणून त्यांच्यापासून ते गुप्त ठेवण्यात आले होते आणि या गोष्टींविषयी त्यास विचारण्याची त्यांना भीती वाटली.
लूक 9:43-45 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले. येशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्चर्य करत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा; कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.” ही गोष्ट त्यांना समजली नाही; ती त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून ती गुप्त ठेवण्यात आली होती; आणि ह्या गोष्टीविषयी त्याला विचारायला ते भीत होते.
लूक 9:43-45 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अदेवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले! बयेशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्चर्य व्यक्त करीत असता, तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, “तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे.” परंतु हे वचन त्यांना समजले नाही. ते त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून ते गुप्त ठेवण्यात आले होते आणि ह्याविषयी त्याला विचारण्यास ते धजत नव्हते.