YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 9:18-22

लूक 9:18-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि असे झाले की तो एकांतात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते, तेव्हा त्याने त्यांना विचारून म्हटले, “लोकसमुदाय मला कोण म्हणून म्हणतात?” मग त्यांनी उत्तर देऊन म्हटले, “बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात ‘एलीया,’ व कित्येक म्हणतात की, पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक पुन्हा उठला आहे.” त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” तेव्हा पेत्राने उत्तर देऊन म्हटले, “देवाचा ख्रिस्त.” पण हे कोणाला सांगू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली. आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि वडील व मुख्य याजक लोक व नियमशास्त्र शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, याचे अगत्य आहे.”

सामायिक करा
लूक 9 वाचा

लूक 9:18-22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

एकदा येशू एकटेच प्रार्थना करीत होते आणि त्यांचे शिष्य जवळच होते. येशूंनी त्यांना विचारले, “समुदाय मी कोण आहे म्हणून ओळखतात?” ते म्हणाले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीया; आणखी काहीजण म्हणतात, आपण मरणातून उठलेले प्राचीन काळातील एक संदेष्टे आहात.” “परंतु तुमचे काय मत आहे?” येशूंनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही परमेश्वराचे ख्रिस्त आहात.” येशूंनी त्यांना निक्षून आज्ञा केली की हे कोणालाही सांगू नका. ते म्हणाले, “मानवपुत्राला पुष्कळ दुःख सहन करावे लागेल त्याचप्रमाणे यहूदी पुढारी, वडीलजन, प्रमुख याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जाऊन त्याचा वध होणे हे आवश्यक आहे पण तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेन.”

सामायिक करा
लूक 9 वाचा

लूक 9:18-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर असे झाले की, तो एकान्तात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; पण कित्येक म्हणतात एलीया; आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे.” त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.” मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली; आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे, आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.”

सामायिक करा
लूक 9 वाचा

लूक 9:18-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तो एकान्ती प्रार्थना करत असता शिष्य त्याच्या बरोबर होते. त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?” त्यांनी उत्तर दिले, “बाप्तिस्मा देणारा योहान, पण कित्येक म्हणतात, एलिया आणि आणखी काही लोक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांतील एखादा पुन्हा उठला आहे.” त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून मानता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा मसिहा.” हे कोणाला कळता कामा नये, असा त्याने त्यांना निक्षून आदेश दिला. शिवाय त्याने त्यांना हेदेखील सांगितले की, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख भोगावे, वडीलजन, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, ठार मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठविले जावे, हे घडणे क्रमप्राप्त आहे.

सामायिक करा
लूक 9 वाचा