लूक 9:13-14
लूक 9:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आमच्याजवळ काही नाही.” कारण ते सुमारे पाच हजार पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास-पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यांना बसवा.”
लूक 9:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.” कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा,”
लूक 9:13-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत—तर या सर्व लोकांस पुरेल इतके अन्न आम्ही जाऊन विकत आणले तर हे शक्य आहे” तेथे पुरुषांचीच संख्या जवळजवळ पाच हजार होती. येशू शिष्यांना म्हणाले, “जवळजवळ पन्नास लोक अशाप्रकारे गटागटाने त्यांना खाली बसू द्या.”
लूक 9:13-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन ह्या सर्व लोकांसाठी अन्न विकत आणले नाही तर पाच भाकरी व दोन मासे ह्यांव्यतिरिक्त आमच्याजवळ काही नाही.” तेथे सुमारे पाच हजार पुरुष होते. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “सुमारे पन्नास पन्नास जणांचे गट करून त्यांना बसवा.”