लूक 9:10-11
लूक 9:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग प्रेषितांनी परत येऊन आपण जे काही केले होते ते त्यास सविस्तर सांगितले. मग तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगराकडे एकीकडे गेला. परंतु याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्यामागे गेले. तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलू लागला आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले.
लूक 9:10-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर प्रेषित परत आले आणि आपण काय केले याचा सर्व वृतांत त्यांनी सादर केला, येशू त्यांना घेऊन बेथसैदा या शहराकडे एकांतस्थळी निघून गेले. परंतु समुदायाला हे कळले व ते त्यांच्यामागे गेले. येशूंनी त्यांचे स्वागत केले व त्यांना परमेश्वराच्या राज्याविषयी शिक्षण दिले आणि बरे होण्याची ज्यांना गरज होती त्यांना बरे केले.
लूक 9:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते त्याला सविस्तर सांगितले; तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या गावाकडे एकान्त स्थळी गेला. हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले; तेव्हा त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता, आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता.
लूक 9:10-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते ते येशूला सविस्तर सांगितले. तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नावाच्या नगरात एकांत स्थळी गेला. हे समजल्यावर लोकसमुदाय त्याच्यामागून गेले. त्यांचे स्वागत करून तो त्यांच्याबरोबर देवाच्या राज्याविषयी बोलत होता. ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना तो बरे करत होता.