लूक 7:6-9
लूक 7:6-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यामूळे येशू त्यांच्याबरोबर मार्गात चालत गेला आणि तो घरापासून फार दूर नव्हता, तोच त्या शताधीपतीने मित्रांना त्यांच्याकडे पाठवून म्हटले, प्रभू, आपण त्रास करून घेऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावे असा मी योग्य नाही. त्यामुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा सेवक बरा होईल. कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला मनुष्य असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत; आणि याला मी म्हणतो, जा, म्हणजे हा जातो व दुसऱ्याला ये म्हणतो, म्हणजे तो येतो आणि माझ्या दासास म्हणतो, हे कर, म्हणजे तो ते करतो. जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्यास त्याच्याविषयी आश्चर्य वाटले, तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, “मी तुम्हास सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.”
लूक 7:6-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून येशू त्यांच्याबरोबर निघाले. पण घरापासून फार दूर नव्हते तेव्हा शताधिपतीने आपल्या मित्रांच्या हाती निरोप पाठविला: “प्रभू, माझ्या छप्पराखाली येण्याचा आपण त्रास घेऊ नका कारण त्यासाठी मी योग्य नाही. आणि या कारणामुळेच तुमच्याकडे येण्यासाठी मी स्वतःला सुद्धा योग्य समजत नाही. परंतु तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. कारण मी स्वतः अधिकाराच्या अधीन असलेला मनुष्य असून, माझ्या अधिकाराखाली सैनिक आहेत. मी एकाला, ‘जा,’ म्हटले की तो जातो आणि दुसर्याला, ‘ये,’ म्हटले की तो येतो आणि माझ्या नोकराला, ‘हे,’ कर अथवा, ‘ते,’ कर असे म्हटले तर तो ते करतो.” येशूंनी हे ऐकले, तेव्हा ते त्याच्या बोलण्यावरून आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यामागे आलेल्या लोकांच्या गर्दीकडे वळून ते म्हणाले, “मी तुम्हाला सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलमध्ये सुद्धा दिसून आला नाही.”
लूक 7:6-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा येशू त्यांच्याबरोबर गेला; मग तो घराजवळ येताच त्याने त्याच्याकडे आपल्या मित्रांना पाठवून त्याला म्हटले, “प्रभूजी, श्रम घेऊ नका; कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही; ह्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही; तर शब्द मात्र बोला1 म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार माणूस असून माझ्या स्वाधीन शिपाई आहेत; मी एकाला ‘जा’ म्हटले म्हणजे तो जातो, दुसर्याला ‘ये’ म्हटले म्हणजे तो येतो, आणि आपल्या दासाला ‘अमुक कर’ म्हटले म्हणजे तो ते करतो.” ह्या गोष्टी ऐकून येशूला त्याचे आश्चर्य वाटले; आणि तो वळून आपल्यामागे चालणार्या लोकसमुदायाला म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, एवढा विश्वास मला इस्राएलातही आढळला नाही.”
लूक 7:6-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घराजवळ येताच रोमन अधिकाऱ्याने त्याच्याकडे त्याच्या मित्रांना पाठवून त्याला विनंती केली, “प्रभो, आपण तसदी घेऊ नका कारण आपण माझ्या छपराखाली यावे इतकी माझी योग्यता नाही. ह्यामुळे आपल्याकडे येण्यास मी स्वतःला योग्य मानले नाही; आपण एक शब्द बोलला तरी माझा चाकर बरा होईल. कारण मीदेखील अधिकारी असून माझ्या हाताखाली सैनिक आहेत. मी एकाला जा म्हटले तर तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले तर तो येतो, माझ्या दासाला अमुक कर म्हटले म्हणजे तो ते करतो.” हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले आणि तो वळून आपल्यामागे चालणाऱ्या लोकसमुदायाला म्हणाला, “मी तुम्हांला सांगतो, असा विश्वास मला इस्राएलमध्येही आढळला नाही!”