लूक 7:11-13
लूक 7:11-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि दुसऱ्या दिवशी असे झाले की, तो नाईन नावाच्या नगराकडे जात होता आणि त्याचे पुष्कळ शिष्य व मोठा समुदाय हे त्याच्याबरोबर जात होते. जसा तो गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा पाहा कोणाएका मरण पावलेल्या मनुष्यास बाहेर घेऊन जात होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती; आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला “रडू नकोस”
लूक 7:11-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यानंतर लगेच, येशू नाईन नावाच्या गावी गेले आणि त्यांचे शिष्य आणि मोठा जमावही त्यांच्याबरोबर गेला. ते गावाच्या वेशीजवळ आले असता एका मुलाची प्रेतयात्रा बाहेर पडत होती व तो आपल्या विधवा आईचा एकुलता एक पुत्र होता. तिच्याबरोबर गावातील मोठा लोकसमूह होता. प्रभूने तिला पाहिले, तेव्हा त्यांचे हृदय कळवळले आणि ते तिला म्हणाले, “रडू नकोस.”
लूक 7:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर लवकरच असे झाले की, तो नाईन नावाच्या गावास गेला आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्याबरोबर गेला. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला तेव्हा पाहा, कोणाएका मृत माणसाला बाहेर नेत होते; तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती; आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.”
लूक 7:11-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर लवकरच येशू नाईन नावाच्या गावाला गेला. त्याचे शिष्य व बरेच लोक त्याच्याबरोबर गेले. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहचला, तेव्हा तेथून एका मृत माणसाची अंत्ययात्रा जात होती. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती. त्या नगरातले पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला, “रडू नकोस.”