YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 6:46-49

लूक 6:46-49 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

“तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणता, पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही? प्रत्येकजण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्या आज्ञा पाळतो तो कसा आहे हे मी तुम्हास दाखवितो. तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा घरावर आदळला, पण पाण्याने ते हलले नाही, कारण ते चांगले बांधले होते. पण जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही तो ज्याने आपले घर पाया न घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे, त्या घरावर पाण्याचा लोंढा आदळला आणि ते लागलेच पडले व त्या घराचा मोठा नाश झाला.”

सामायिक करा
लूक 6 वाचा

लूक 6:46-49 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“तुम्ही मला, ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे का म्हणता आणि मी जे सांगितले ते करीत नाही? असे प्रत्येकजण जे माझ्याकडे येतात आणि माझी वचने ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, ते कशाप्रकारचे आहेत हे मी तुम्हाला दाखवितो. ते कोणाएका मनुष्यासारखे आहेत, ज्याने खोल पाया खणून आपले घर खडकावर बांधले. मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा त्या घरावर जोराने आदळला; तरी त्यामुळे ते घर हलू शकले नाही, कारण ते भक्कमपणे बांधले होते. जे कोणी माझी वचने ऐकतात पण ते आचरणात आणत नाहीत, तर ते पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्‍या मूर्ख माणसासारखे आहेत. ज्या क्षणी जोराचा प्रवाह त्या घरावर आदळला, त्याच क्षणी ते कोसळले आणि त्याचा संपूर्ण नाश झाला.”

सामायिक करा
लूक 6 वाचा

लूक 6:46-49 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो, ते का करत नाही? जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो. तो एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला. पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरीही तो लोंढा त्या घराला हालवू शकला नाही कारण ते मजबूत बांधले होते. परंतु जो ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही, तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे. त्या घरावर पुराचा लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्याचा भीषण विनाश झाला!”

सामायिक करा
लूक 6 वाचा