लूक 5:5-7
लूक 5:5-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिमोनाने उत्तर दिले, “साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो.” मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले. ते आले आणि त्या दोन्ही होड्या माश्यांनी इतक्या भरल्या की, त्या बुडू लागल्या.
लूक 5:5-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही रात्रभर परिश्रम केले, पण काहीच हाती लागले नाही. पण तुम्ही सांगता, म्हणून जाळे टाकतो.” तसे केल्यानंतर, त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने मासे पकडले की त्यांच्या जाळ्या फाटू लागल्या. जे सहकारी दुसर्या होडीत होते, त्यांनी येऊन आपल्याला मदत करावी म्हणून त्यांनी त्यांना इशारा केला आणि लवकरच त्या दोन होड्या माशांनी इतक्या गच्च भरल्या की बुडू लागल्या.
लूक 5:5-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शिमोनाने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यांत सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसर्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले.
लूक 5:5-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शिमोनने त्याला उत्तर दिले, “गुरुवर्य, आम्ही सारी रात्र मेहनत केली परंतु काहीच धरले नाही, तरीदेखील आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” त्यांनी तसे केल्यावर माशांचा इतका मोठा थवा जाळ्यांत सापडला की, त्यांची जाळी फाटू लागली. दुसऱ्या मचव्यात असलेल्या साथीदारांनी येऊन आपणांस साहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. ते आल्यावर दोन्ही मचवे माशांनी इतके भरले की, ते बुडू लागले.