लूक 5:33-34
लूक 5:33-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य नेहमी उपवास आणि प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य तर खातपीत असतात. येशू त्यांना म्हणाला, “कोण असे करेल? वऱ्हाडाबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हास त्यांना उपवास करावयास लावता येईल काय?
लूक 5:33-34 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते येशूंना म्हणाले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्य उपास करतात, परंतु तुमचे शिष्य मात्र खातात व पितात.” यावर येशूंनी त्यांना विचारले, “वराचे मित्र त्यांच्याबरोबर असताना उपवास कसे करतील?
लूक 5:33-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात; तसे परूश्यांचेही शिष्य करतात; आपले शिष्य तर खातात पितात.” येशूने त्यांना म्हटले, “वर्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपास करायला लावता येईल काय?
लूक 5:33-34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर त्यांनी त्याला म्हटले, “योहानचे शिष्य वारंवार उपवास व प्रार्थना करतात, तसेच परुश्यांचेही शिष्य करतात परंतु आपले शिष्य खातपीत असतात.” येशूने त्यांना म्हटले, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे, तोपर्यंत तुम्हांला त्यांना उपवास करायला लावता येईल काय?