YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 5:1-6

लूक 5:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले, तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्यांची जाळी धूत होते. त्यातील एका होडीत येशू गेला जी शिमोनाची होती आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला. त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, “होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.” शिमोनाने उत्तर दिले, “साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो.” मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली

सामायिक करा
लूक 5 वाचा

लूक 5:1-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्‍यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. त्यांनी पाण्याच्या कडेला कोळ्यांनी ठेवलेल्या दोन होड्या पाहिल्या कारण कोळी आपली जाळी धूत होते. त्यापैकी एका होडीत ते बसले जी शिमोनाची होती, आणि ती काठापासून थोडीशी बाजूला करावी असे त्यांनी शिमोनाला सांगितले. मग त्या होडीत बसून त्यांनी लोकांना शिक्षण दिले. येशूंनी आपले बोलणे संपविल्यानंतर, ते शिमोनास म्हणाले, “होडी खोल पाण्यात ने आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक.” शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही रात्रभर परिश्रम केले, पण काहीच हाती लागले नाही. पण तुम्ही सांगता, म्हणून जाळे टाकतो.” तसे केल्यानंतर, त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने मासे पकडले की त्यांच्या जाळ्या फाटू लागल्या.

सामायिक करा
लूक 5 वाचा

लूक 5:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या1 किनार्‍याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनार्‍याला लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता; त्यावर चढून तो किनार्‍यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, “खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.” शिमोनाने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यांत सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली.

सामायिक करा
लूक 5 वाचा

लूक 5:1-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

एकदा येशू गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा असताना लोकसमुदाय देवाचे वचन ऐकण्यासाठी त्याच्याजवळ गर्दी करीत होता. त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले. त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनचा होता. त्यावर चढून तो मचवा किनाऱ्यापासून थोडासा लोटावा,असे त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायास प्रबोधन करू लागला. आपले प्रबोधन संपविल्यावर त्याने शिमोनला म्हटले, “खोल पाण्यात हाकार आणि मासे धरण्यासाठी तुम्ही तुमची जाळी खाली सोडा.” शिमोनने त्याला उत्तर दिले, “गुरुवर्य, आम्ही सारी रात्र मेहनत केली परंतु काहीच धरले नाही, तरीदेखील आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो.” त्यांनी तसे केल्यावर माशांचा इतका मोठा थवा जाळ्यांत सापडला की, त्यांची जाळी फाटू लागली.

सामायिक करा
लूक 5 वाचा