लूक 5:1-4
लूक 5:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले, तेव्हा त्याने सरोवरात दोन होड्या पाहिल्या, पण होडीतील मासे पकडणारे बाहेर होते व त्यांची जाळी धूत होते. त्यातील एका होडीत येशू गेला जी शिमोनाची होती आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला. त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, “होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.”
लूक 5:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. त्यांनी पाण्याच्या कडेला कोळ्यांनी ठेवलेल्या दोन होड्या पाहिल्या, कारण कोळी आपली जाळी धूत होते. त्यापैकी एका होडीत ते बसले जी शिमोनाची होती आणि ती काठापासून थोडीशी बाजूला करावी असे त्यांनी शिमोनाला सांगितले. मग त्या होडीत बसून त्यांनी लोकांना शिक्षण दिले. येशूंनी आपले बोलणे संपविल्यानंतर, ते शिमोनास म्हणाले, “होडी खोल पाण्यात ने आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक.”
लूक 5:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या1 किनार्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनार्याला लागलेले दोन मचवे पाहिले; त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता; त्यावर चढून तो किनार्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, “खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा.”
लूक 5:1-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
एकदा येशू गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा असताना लोकसमुदाय देवाचे वचन ऐकण्यासाठी त्याच्याजवळ गर्दी करीत होता. त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले दोन मचवे पाहिले. त्यांवरील कोळी खाली उतरून जाळी धूत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनचा होता. त्यावर चढून तो मचवा किनाऱ्यापासून थोडासा लोटावा,असे त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायास प्रबोधन करू लागला. आपले प्रबोधन संपविल्यावर त्याने शिमोनला म्हटले, “खोल पाण्यात हाकार आणि मासे धरण्यासाठी तुम्ही तुमची जाळी खाली सोडा.”