YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 4:16-21

लूक 4:16-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग जेथे तो लहानाचा मोठा झाला होता त्या नासरेथांत तो आला आणि शब्बाथ दिवशी त्यांच्या प्रथेप्रमाणे सभास्थानात जाऊन ग्रंथ वाचण्यासाठी उभा राहिला, आणि यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्यास देण्यात आला. त्याने ते पुस्तक उघडले आणि जो भाग शोधून काढला, त्याठिकाणी असे लिहिले आहे, “प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण, गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टी पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी त्याने मला पाठवले आहे.” मग त्याने ग्रंथपट बंद करून सभास्थानाच्या सेवकाला परत करून तो खाली बसला. सभास्थानातील प्रत्येकजण त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली की, “तुमच्या ऐकण्यामुळे आज हा शास्त्रलेख पूर्ण झाला आहे.”

सामायिक करा
लूक 4 वाचा

लूक 4:16-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ज्या नासरेथ गावी त्यांची वाढ झाली होती तेथे ते आले व नेहमीप्रमाणे शब्बाथ दिवशी प्रथेप्रमाणे सभागृहामध्ये पवित्रशास्त्र वाचण्यासाठी उभे राहिले. यशया संदेष्टा याचे भविष्य असलेली गुंडाळी त्यांच्या हाती देण्यात आली आणि त्यांनी ते उघडले ज्यात असे लिहिलेले होते: “परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण त्यांनी मला अभिषेक केला आहे गरीबांना शुभवार्ता जाहीर करावी. कैद्यांच्या सुटकेसाठी घोषणा जाहीर करण्यास; आंधळ्यांना दृष्टी देण्यास, जुलूम करणार्‍यांपासून सोडविण्यास त्यांनी मला पाठविले आहे, प्रभुच्या कृपादृष्टीचे वर्ष जाहीर करण्यास पाठविले आहे.” नंतर गुंडाळी गुंडाळून, ती सेवकाकडे दिली व ते खाली बसले. सभागृहामधील प्रत्येक व्यक्तिची नजर त्यांच्यावर एकवटली होती. येशू पुढे त्यांना म्हणाले, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत आहात तो पूर्ण झाला आहे.”

सामायिक करा
लूक 4 वाचा

लूक 4:16-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग ज्या नासरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचन करण्यास उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला; त्याने तो उलगडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले आहे : “परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास, [भग्नहृदयी जनांस बरे करण्यास] त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे; परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.” मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांना म्हणू लागला की, “हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”

सामायिक करा
लूक 4 वाचा

लूक 4:16-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ज्या नासरेथमध्ये तो लहानाचा मोठा झाला होता, तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे साबाथ दिवशी सभास्थानात जाऊन वाचायला उभा राहिला. तेव्हा यशया संदेष्ट्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जो उतारा काढला त्यात असे लिहिले होते: प्रभूचा आत्मा माझ्यामध्ये आला आहे, कारण गरिबांना शुभवर्तमान सांगण्यासाठी त्याने मला अभिषिक्त केले आहे. धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची मी घोषणा करावी, तसेच जे ठेचले जात आहेत त्यांची सुटका करावी व प्रभूच्या अनुग्रहाचे वर्ष आले आहे हे जगजाहीर करावे म्हणून मला पाठविण्यात आले आहे. मग ग्रंथपट गुंडाळून व तो सेवकास परत देऊन तो खाली बसला. सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. तो त्यांना म्हणू लागला, “हा धर्मशास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे.”

सामायिक करा
लूक 4 वाचा