लूक 3:19-20
लूक 3:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पण त्याने मांडलिक हेरोद ह्याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे, त्याने ह्या सर्वांहून अधिक हेही केले की, योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले.
लूक 3:19-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
योहानाने चौथाईचा शासक हेरोद याची कानउघडणी केली कारण त्याचे त्याच्या भावाच्या पत्नी हेरोदीया हिच्याशी अनैतिक संबंध होते, तसेच इतर अनेक वाईट गोष्टी त्याने केल्या होत्या. हे सर्व करून सुद्धा त्याने आणखी एक दुष्कर्म केले ते म्हणजे त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
लूक 3:19-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
योहानाने मांडलिक हेरोदाला दोष दिला, कारण त्याने आपल्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याशी िववाह केला आणि इतर अनेक वाईट गोष्टी केल्या, या सर्वांमध्ये हेरोदाने आणखी भर घातली: त्याने योहानाला तुरुंगात टाकले.
लूक 3:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पण त्याने मांडलिक हेरोद ह्याला त्याच्या भावाची बायको हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे, त्याने ह्या सर्वांहून अधिक हेही केले की, योहानाला तुरुंगात कोंडून ठेवले.
लूक 3:19-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मात्र त्याने राज्यकर्ता हेरोद ह्याला त्याच्या भावाची पत्नी हेरोदिया हिच्याविषयी आणि त्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांविषयी दोष दिल्यामुळे हेरोदने ह्या सर्वांहून अधिक मोठे दुष्कर्म केले; ते म्हणजे त्याने योहानला तुरुंगात कोंडून ठेवले.