लूक 24:46-49
लूक 24:46-49 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तो त्यांना म्हणाला, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मरण पावलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे, आणि यरूशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा घोषित करण्यात यावी. या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात. पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत या शहरात राहा.”
लूक 24:46-49 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी पुढे म्हटले, “ख्रिस्ताने दुःख सहन करावे, मरावे आणि तिसर्या दिवशी मरणातून पुन्हा उठावे या गोष्टी फार पूर्वी लिहून ठेवल्या होत्या. आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रांमध्ये त्यांच्या नावाने पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करण्यात यावी. तुम्ही या सर्व गोष्टींचे साक्षी आहात. माझ्या पित्याने अभिवचन दिलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवीन. तुम्हाला वरून सामर्थ्य मिळेपर्यंत या शहरातच राहा.”
लूक 24:46-49 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख सोसावे, तिसर्या दिवशी मेलेल्यांतून उठावे, आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षी आहात. पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरुशलेम शहरात राहा.”
लूक 24:46-49 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याने त्यांना म्हटले, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून उठावे आणि यरुशलेमपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी. तुम्ही ह्या गोष्टींचे साक्षीदार आहात. पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेले वरदान मी तुमच्याकडे पाठवतो. मात्र तुम्हांला स्वर्गीय सामर्थ्याचे वरदान प्राप्त होईपर्यंत ह्या शहरात राहा.”