लूक 24:36-40
लूक 24:36-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते.” असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले.
लूक 24:36-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यास म्हणाला, “तुम्हास शांती असो.” ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या? माझे हात व पाय पाहा तुम्हास मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भूताला नसते.” असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना.
लूक 24:36-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते हे सर्व सांगत असतानाच, प्रत्यक्ष येशू स्वतः अकस्मात त्यांच्यामध्ये उभे राहिले आणि म्हणाले, “तुम्हाला शांती असो.” आपण एखादा दुष्टात्मा पाहत आहोत असे वाटून, ते सर्व विलक्षण भयभीत झाले. येशूंनी त्यांना विचारले, “तुम्ही का घाबरला आणि तुमच्या मनात संशय का आला? माझे हात व माझे पाय पाहा. मी तोच आहे. भुतांना मांस व हाडे नसतात, पण मला ती आहेत हे तुम्ही पाहत आहात.” हे बोलल्यावर येशूंनी आपले हात व पाय त्यांना दाखविले.
लूक 24:36-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरलात व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते.” असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले.
लूक 24:36-40 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते दोघे ह्या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती लाभो.” ते भयभीत झाले. आपण भूत पाहत आहोत, असे त्यांना वाटले. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही का घाबरता व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पाहा. मी स्वतः तो आहे. मला चाचपून पाहा. जसे मला हाडमांस असलेले पाहता, तसे भुताला नसते.” असे बोलून त्याने त्यांना त्याचे हात व पाय दाखवले.