YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 24:13-18

लूक 24:13-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्याच दिवशी त्याच्यातील दोघे शिष्य यरूशलेम शहरापासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते. ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला. पण त्यांचे डोळे त्यास ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते. येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?” चालता चालता ते थांबले. ते अतिशय दुःखी दिसले. त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्यास म्हणाला, “या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरूशलेम शहरात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”

सामायिक करा
लूक 24 वाचा

लूक 24:13-18 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी, येशूंचे दोन अनुयायी यरुशलेमपासून अंदाजे सात मैल असलेल्या अम्माऊस गावी चालले होते. घडलेल्या त्या सर्व गोष्टींविषयी ते एकमेकांबरोबर बोलत होते. ते एकमेकांशी बोलत व चर्चा करीत असताना प्रत्यक्ष येशू तेथे आले आणि त्यांच्याबरोबर चालू लागले. परंतु ते त्यांना ओळखणार नाहीत असे करण्यात आले होते. येशूंनी त्यांना विचारले, “चालताना, तुम्ही काय चर्चा करीत आहात?” हा प्रश्न ऐकून ते शांत उभे राहिले, त्यांचे चेहरे दुःखी झाले. त्यांच्यापैकी क्लयपा नावाचा एकजण म्हणाला, “गेल्या काही दिवसात यरुशलेममध्ये घडलेल्या त्या घटनांची माहिती नसलेले असे तुम्ही एकटेच आहात काय?”

सामायिक करा
लूक 24 वाचा

लूक 24:13-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे जण यरुशलेमेपासून सुमारे चार कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करत होते. आणि असे झाले की, ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला; परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या?” तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लयपा नावाच्या इसमाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?”

सामायिक करा
लूक 24 वाचा

लूक 24:13-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्याच दिवशी येशूच्या शिष्यांपैकी दोघे जण यरुशलेमपासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला जायला निघाले होते. घडलेल्या सर्व घटनांविषयी ते एकमेकांशी संभाषण करत होते. ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला. त्यांनी त्याला पाहिले परंतु ओळखले नाही. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात, त्या कोणत्या?” ते दुःखी होऊन उभे राहिले. त्यांच्यातील क्लयपा नावाच्या एकाने त्याला उत्तर दिले, “अलीकडे यरुशलेममध्ये घडलेल्या घटना ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय?”

सामायिक करा
लूक 24 वाचा