YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 23:8-12

लूक 23:8-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हेरोदाने येशूला पाहिले तेव्हा त्यास फार आनंद झाला, कारण त्याने त्याजविषयी ऐकले होते व त्यास असे वाटत होते की, तो एखादा चमत्कार करील व आपल्याला तो बघायला मिळेल अशी आशा त्यास होती. त्याने येशूला अनेक प्रश्न विचारले, पण येशूने त्यास उत्तर दिले नाही. मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक तेथे उभे राहून त्याच्याविरुध्द जोरदारपणे आरोप करीत होते. हेरोदाने त्याच्या शिपायांसह येशूला अपमानास्पद वागणूक दिली, त्याची थट्टा केली. त्यांनी त्याच्यावर एक तलम झगा घातला व त्यास पिलाताकडे परत पाठवले. त्याच दिवशी हेरोद आणि पिलात एकमेकांचे मित्र बनले त्यापुर्वी ते एकमेकांचे वैरी होते.

सामायिक करा
लूक 23 वाचा

लूक 23:8-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशूंना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्यामुळे हेरोद आनंदित झाला. कारण येशूंविषयी त्याने पुष्कळ ऐकले होते आणि त्याने केलेला एखादा चमत्कार डोळ्यांनी पाहण्याची त्याची फार इच्छा होती. त्याने येशूंना अनेक प्रश्न विचारले, परंतु येशूंनी त्याच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. इकडे मुख्य याजक आणि नियमशास्त्र शिक्षक उभे राहून आवेशाने येशूंवर आरोप करीत राहिले. त्यावेळी हेरोद आणि त्याचे शिपाई येशूंचा उपहास आणि चेष्टा करू लागले. त्यांना झगझगीत कपडे घालून त्यांनी पिलाताकडे परत पाठविले. त्या दिवशी हेरोद आणि पिलात मित्र झाले. त्याआधी ते एकमेकांचे शत्रू होते.

सामायिक करा
लूक 23 वाचा

लूक 23:8-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला; कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बर्‍याच दिवसांपासून त्याची इच्छा होती, आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहायला मिळेल अशी त्याला आशा होती. त्याने त्याला बरेच प्रश्‍न केले; परंतु येशूने काही उत्तर दिले नाही. मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते. आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठवले. त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले; त्यापूर्वी त्यांचे आपसांत वैर होते.

सामायिक करा
लूक 23 वाचा

लूक 23:8-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशूला पाहून हेरोदला फार आनंद झाला, कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे, अशी बऱ्याच दिवसांपासून त्याची इच्छा होती. येशूच्या हातून घडलेले एखादे चिन्ह पाहायला मिळेल, अशी त्याला आशा होती. त्याने त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले परंतु येशूने काही उत्तर दिले नाही. मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते. हेरोदने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगमगीत लांब झगा त्याच्या अंगावर घालून त्याला पिलातकडे परत पाठवले. त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले. त्यापूर्वी त्यांचे आपसात वैर होते.

सामायिक करा
लूक 23 वाचा