लूक 22:49-51
लूक 22:49-51 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याच्याभोवती जे होते ते काय होणार हे ओळखून त्यास म्हणाले, “प्रभू, आम्ही तलवार चालवावी काय?” त्यांच्यापैकी एकाने महायाजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला. येशूने उत्तर दिले, “हे पुरेसे असू द्या.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले.
लूक 22:49-51 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता काय होणार हे शिष्यांनी ओळखले आणि येशूंना विचारले, “प्रभुजी, आम्ही तरवार चालवावी काय?” तेवढ्यात त्यांच्यातील एकाने प्रमुख याजकाच्या दासावर वार करून त्याचा उजवा कान कापून टाकला. येशूंनी शिष्यांना म्हटले, “पुरे करा.” आणि त्यांनी त्या मनुष्याचा कान स्पर्श करून बरा केला.
लूक 22:49-51 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच्यासभोवती जे होते ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी काय?” त्यांच्यातील एकाने प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला. तेव्हा येशूने म्हटले, “एवढे होऊ द्या!” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले.
लूक 22:49-51 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याच्या सभोवती जे होते, ते आता काय होणार, हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभो, आम्ही तलवारी चालवू काय?” त्यांच्यातील एकाने उच्च याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला. परंतु येशूने म्हटले, “नाही, असे नको.” त्याने त्या दासाच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले.