लूक 22:41-44
लूक 22:41-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले आणि अशी प्रार्थना केली, “पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्यास सामर्थ्य देत राहिला दु:खाने ग्रासलेला असतांना त्याने अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.
लूक 22:41-44 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर ते त्यांच्यापासून सुमारे दगड फेकला जाईल इतक्या अंतरावर गेले, त्यांनी गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. “हे पित्या, जर तुमची इच्छा असेल, तर हा प्याला माझ्यापासून दूर करा; तरी माझी इच्छा नाही तर तुमची पूर्ण होऊ द्या.” तेव्हा स्वर्गातून एक देवदूत त्यांच्यापुढे प्रकट झाला आणि त्यांना सामर्थ्य पुरविले. येशू आत्म्यामध्ये इतके व्याकुळ झाले की, त्यांनी अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्यांचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.
लूक 22:41-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो दूर गेला; आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला. मग अत्यंत विव्हळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे मोठमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता.
लूक 22:41-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मग सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो त्यांच्यापासून दूर गेला, तेथे त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली: ‘हे पित्या, तुझी इच्छा असली, तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीही माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” [तेव्हा स्वर्गातील एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. त्याने येशूला शक्ती दिली. त्यानंतर अत्यंत विव्हळ होऊन येशूने अधिक कळकळीने प्रार्थना केली, तेव्हा रक्ताचे थेंब भूमीवर पडावेत तसा त्याचा घाम पडत होता.]