लूक 22:39-43
लूक 22:39-43 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग तो निघून आपल्या रीतीप्रमाणे जैतूनाच्या डोंगराकडे गेला व शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. तेव्हा त्याठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.” तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले आणि अशी प्रार्थना केली, “पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्यास सामर्थ्य देत राहिला
लूक 22:39-43 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नेहमीप्रमाणे जैतून डोंगराकडे जाण्यासाठी येशू बाहेर पडले आणि त्यांचे शिष्य त्यांच्या मागोमाग गेले. तेथे पोहोचल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.” नंतर ते त्यांच्यापासून सुमारे दगड फेकला जाईल इतक्या अंतरावर गेले, त्यांनी गुडघे टेकले आणि प्रार्थना केली. “हे पित्या, जर तुमची इच्छा असेल, तर हा प्याला माझ्यापासून दूर करा; तरी माझी इच्छा नाही तर तुमची पूर्ण होऊ द्या.” तेव्हा स्वर्गातून एक देवदूत त्यांच्यापुढे प्रकट झाला आणि त्यांना सामर्थ्य पुरविले.
लूक 22:39-43 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनांच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.” मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो दूर गेला; आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, “हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” तेव्हा स्वर्गातून एक देवदूत येऊन आपणाला शक्ती देताना त्याने पाहिला.
लूक 22:39-43 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे ऑलिव्ह डोंगराकडे गेला. त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले. त्या ठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही मोहात पडू नये म्हणून प्रार्थना करा.” मग सुमारे धोंड्याच्या टप्प्याइतका तो त्यांच्यापासून दूर गेला, तेथे त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली: ‘हे पित्या, तुझी इच्छा असली, तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरीही माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” [तेव्हा स्वर्गातील एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला. त्याने येशूला शक्ती दिली.