लूक 22:31-32
लूक 22:31-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग प्रभू म्हणाला, “शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली; परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”
लूक 22:31-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे. परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.”
लूक 22:31-32 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“शिमोना, शिमोना, तुम्हा सर्वांची गव्हासारखी चाळणी करावी म्हणून सैतानाने विचारले आहे. परंतु शिमोना, तुझा विश्वास डळमळू नये म्हणून मी प्रार्थना केली आहे, की तू आपल्या विश्वासात खचू नये. ज्यावेळी तू परत वळशील, त्यावेळी आपल्या बंधुंना बळकट कर.”
लूक 22:31-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रभू पुढे म्हणाला, “शिमोन, शिमोन, पाहा, तुम्हांला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने परवानगी मिळवली आहे. परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी प्रार्थना केली आहे. तू माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”