लूक 22:3-6
लूक 22:3-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला; तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले. तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला. त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.
लूक 22:3-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा बारा प्रेषितांपैकी एकात, म्हणजे यहूदात इस्कर्योतामध्ये सैतान शिरला. यहूदा मुख्य याजक लोक व परमेश्वराच्या भवनाचे अधिकारी यांच्याकडे गेला आणि त्यांच्या हाती येशूला कसे धरुन देता येईल याविषयीची बोलणी केली. त्यांना फार आनंद झाला व त्यांनी त्यास पैसे देण्याचे मान्य केले. म्हणून त्याने संमती दर्शविली आणि तो येशूला गर्दी नसेल तेव्हा धरुन त्यांच्या हाती देण्याची संधी शोधू लागला.
लूक 22:3-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक म्हणजे यहूदाह इस्कर्योत याच्यात सैतानाने प्रवेश केला. तो प्रमुख याजकवर्ग आणि मंदिराचे सुरक्षा अधिकाऱ्यांकडे गेला आणि येशूंना विश्वासघाताने कसे धरून देता येईल, याविषयी त्याने त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना आनंद झाला आणि त्यांनी त्याला मोबदला देण्याचे मान्य केले. या गोष्टीला त्याने मान्यता दिली आणि येशूंभोवती समुदाय नसताना त्यांना त्यांच्या हाती देण्याची योग्य संधी तो शोधू लागला.
लूक 22:3-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला; तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले. तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला. त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.
लूक 22:3-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यानंतर बारा प्रेषितांपैकी ज्याला इस्कर्योतदेखील म्हणत, त्या यहुदामध्ये सैतान शिरला. तो मुख्य याजक व मंदिराच्या रक्षकांचे अधिकारी ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती येशूला कसे धरून द्यावे, ह्याविषयी त्याने त्यांच्याशी मसलत केली ते खूश होऊन त्यांनी त्याला पैसे देण्याचे कबूल केले. त्याने होकार दिला आणि लोकांना कळणार नाही अशा वेळी त्यांच्या हाती येशूला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.