लूक 22:14-20
लूक 22:14-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या प्रेषितांसह भोजनास बसला. तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी तुमच्याबरोबर वल्हांडण सणाचे भोजन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती. कारण मी तुम्हास सांगतो की, देवाच्या राज्यात हे परिपूर्ण होईपर्यंत मी पुन्हा हे भोजन करणार नाही.” नंतर येशूने पेला घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपसात याची वाटणी करा. कारण मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत यापुढे मी द्राक्षरस घेणार नाही.” नंतर त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.” त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे.
लूक 22:14-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा ती वेळ आली तेव्हा येशू आणि त्यांचे शिष्य भोजन करण्यास बसले. मग ते शिष्यांना म्हणाले, “माझ्या दुःख सहन करण्यापूर्वी तुमच्याबरोबर हे वल्हांडणाचे भोजन करावे अशी माझी फार इच्छा होती. कारण मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराच्या राज्यात याची पूर्तता झाल्याशिवाय मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” नंतर त्यांनी प्याला घेतला, त्याबद्दल उपकार मानले आणि ते म्हणाले, “हा घ्या आणि तुमच्यामध्ये त्याची वाटणी करा. मी तुम्हाला सांगतो की, परमेश्वराचे राज्य येईपर्यंत मी पुन्हा द्राक्षवेलीचा उपज पिणार नाही.” नंतर येशूंनी भाकर घेतली, आभार मानले आणि ती मोडली आणि ती त्यांना देत असताना म्हणाले, “हे माझे शरीर असून ते तुमच्याकरिता दिले जात आहे; माझ्या स्मरणार्थ हे करा.” भोजन झाल्यानंतर येशूंनी द्राक्षारसाचा प्याला हाती घेतला व म्हणाले, “हा प्याला माझ्या रक्ताने केलेला नवा करार आहे, जे रक्त पुष्कळांसाठी ओतले जात आहे.
लूक 22:14-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती; कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” मग प्याला हातात घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपणांमध्ये ह्याची वाटणी करा; कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही.” मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे; ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे.
लूक 22:14-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ती वेळ आली तेव्हा येशू भोजनास बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे ओलांडण सणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे, अशी माझी उत्कट इच्छा आहे. मी तुम्हांला सांगतो, देवाच्या राज्यात ह्या भोजनाची परिपूर्ती होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” त्यानंतर प्याला घेऊन व देवाचे आभार मानून तो म्हणाला, “हा घ्या आणि तुमच्यांत वाटा. मी तुम्हांला सांगतो, देवाचे राज्य येईपर्यंत हा द्राक्षारस ह्यापुढे मी पिणार नाही.” मग त्याने भाकर घेऊन देवाचे आभार मानले व ती मोडली आणि ती त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पण केले आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला म्हणजे माझ्या रक्तात प्रस्थापित केलेला नवा करार आहे. हे रक्त तुमच्यासाठी ओतले आहे.