लूक 21:37-38 - Compare All Versions
लूक 21:37-38 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक दिवशी तो परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असे आणि रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर राहत असे. सर्व लोक भवनात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे येत असत.
सामायिक करा
लूक 21 IRVMARलूक 21:37-38 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू दररोज मंदिरात शिक्षण देण्यासाठी जात असत, नंतर रोज संध्याकाळी ते जैतून डोंगरावर रात्र घालविण्यासाठी जात असत. आणि सर्व लोक त्यांचे ऐकण्यासाठी सकाळीच मंदिराकडे येत.
सामायिक करा
लूक 21 MRCVलूक 21:37-38 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्यावर राहत असे. सर्व लोक त्याचे ऐकण्यास मोठ्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत.
सामायिक करा
लूक 21 MARVBSIलूक 21:37-38 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
येशू दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन ज्याला ऑलिव्ह डोंगर म्हणतात, तेथे राहात असे आणि सर्व लोक त्याचे प्रबोधन ऐकण्यास भल्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत.
सामायिक करा
लूक 21 MACLBSI