लूक 2:36-38
लूक 2:36-38 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी राहत होती. ती आशेर वंशातील फनूएलाची मुलगी असून ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली. ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती व परमेश्वराचे भवन सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे. तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरूशलेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
लूक 2:36-38 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यावेळी हन्ना संदेष्टी होती, ती आशेर वंशातील फनूएलाची कन्या असून फार वयोवृद्ध होती. लग्नानंतर सात वर्षे तिच्या पतीबरोबर राहिली होती. आणि चौर्याऐंशी वर्षांपर्यंत वैधव्यदशेत होती. तिने मंदिर कधीच न सोडता, रात्रंदिवस प्रार्थना व उपास करून परमेश्वराची आराधना केली. तिने त्यावेळी तेथे येऊन, परमेश्वराची उपकारस्तुती केली आणि जे यरुशलेमची सुटका होण्याची वाट पाहत होते त्या प्रत्येकाला त्या बाळाविषयी सांगू लागली.
लूक 2:36-38 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती, ती आशेराच्या वंशातील फनूएलाची मुलगी होती; ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवर्याजवळ सात वर्षे राहिली होती. आता ती चौर्याऐंशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागली.
लूक 2:36-38 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
देवाचा संदेश देणारी हन्ना नावाची एक फार वयोवृद्ध स्त्री होती. ती आशेरच्या वंशातील फनुएलची मुलगी होती. ती सात वर्षे वैवाहिक जीवन जगली होती. आता ती विधवा चौऱ्याऐंशी वर्षांची होती. मंदिर सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस आराधना करीत असे. तिने त्याच वेळी तेथे येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरुशलेमच्या तारणाची वाट पाहत होते, त्या सर्वांना ती बाळाविषयी सांगू लागली.