लूक 2:29-32
लूक 2:29-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासास शांतीने जाऊ देत आहेस. कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे, ते तू सर्व राष्ट्रांतील लोकांच्या समक्ष तयार केले. ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.”
लूक 2:29-32 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“हे सर्वशक्तिमान प्रभू, तुझ्या वचनाप्रमाणे आता तुझ्या सेवकाला शांतीने घेऊन जावे. मी तुझे तारण माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. जे तू सर्व राष्ट्रांच्या नजरेसमोर सिद्ध केले आहेस, ते गैरयहूदीयांसाठी प्रकटीकरणाचा प्रकाश, आणि आपल्या इस्राएल लोकांचे गौरव असे आहे.”
लूक 2:29-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस; कारण माझ्या डोळ्यांनी ‘तुझे तारण पाहिले आहे.’ ते ‘तू सर्व राष्ट्रांसमक्ष’ सिद्ध केले आहेस. ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या ‘इस्राएल’ लोकांचे ‘वैभव’ असे आहे.”
लूक 2:29-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
“हे प्रभो, तुझे वचन तू पाळले आहे. आता आपल्या दासाला शांतीने जाऊ दे; कारण माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व लोकांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयांना तुझी इच्छा प्रकट व्हावी म्हणून प्रकाश व तुझ्या इस्राएली लोकांचे वैभव आहे.”