लूक 2:22-24
लूक 2:22-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्यास वर यरूशलेम शहरास घेऊन आले; ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे. म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा कबुतरांची दोन पिल्ले यांचा यज्ञ अर्पावा म्हणून त्यांनी त्यास तेथे आणले.
लूक 2:22-24 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्धीकरणाच्या अर्पणाची वेळ आली, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्याला प्रभुला सादर करण्यासाठी यरुशलेमला नेले. कारण प्रभुच्या नियमात असे लिहिलेले आहे, “प्रत्येक प्रथम जन्मलेला पुत्र प्रभुला समर्पित केला पाहिजे.” प्रभुच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हे अर्पण: “दोन पारवे किंवा कबुतराची दोन पिल्ले,” असे होते.
लूक 2:22-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे ‘शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर’ ते त्याला वर यरुशलेमेस घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे; (म्हणजे ‘प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा,’ असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे,) आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘होल्यांचा जोडा किंवा पारव्यांची दोन पिले’ ह्यांचा यज्ञ करावा.
लूक 2:22-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे शुद्धीकरणाचे दिवस जवळ आल्यावर बाळ प्रभूला समर्पित करावे म्हणून योसेफ व मरिया त्याला यरुशलेम येथे घेऊन गेले. म्हणजे ‘प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हणून गणला जावा’, असे जे नियमशास्त्रात लिहिले आहे, त्याप्रमाणे त्यांनी करावे, तसेच प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे कबुतरांची जोडी किंवा पारव्यांची दोन पिले ह्यांचा यज्ञदेखील त्यांनी अर्पण करावा.