YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 2:15-19

लूक 2:15-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग असे झाले की, देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू.” तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक त्यांना सापडले. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्व जण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आश्‍चर्यचकित झाले. परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या.

सामायिक करा
लूक 2 वाचा

लूक 2:15-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि घडलेली ही जी गोष्ट परमेश्वराने आम्हास कळवली ती बघू या. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना दिसले. जेव्हा मेंढपाळांनी त्यास पाहिले तेव्हा त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते त्यांनी सर्वांना जाहीर केले. मग ऐकणारे सर्व जन त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरीयेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या.

सामायिक करा
लूक 2 वाचा

लूक 2:15-19 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

देवदूत त्यांना सोडून स्वर्गात वर गेल्यानंतर, मेंढपाळ एकमेकांस म्हणू लागले: “चला, आपण बेथलेहेमला जाऊ आणि प्रभुने सांगितलेली ही जी घटना घडली आहे, ती प्रत्यक्ष पाहू.” ते घाईघाईने गेले आणि ज्या ठिकाणी ते बालक गव्हाणीत निजले होते तेथे त्यांनी मरीया आणि योसेफ यांना शोधून काढले. त्यांनी त्या बालकाला पाहिल्यानंतर, त्या बालकाविषयी त्यांना जे काही सांगण्यात आले होते, त्या सर्वठिकाणी विदित केल्या. मेंढपाळांनी जे सांगितले व ज्यांनी ऐकले ते सर्वजण आश्चर्यचकित झाले. परंतु मरीयेने ते सर्व आपल्या हृदयात साठवून ठेवले आणि त्यावर ती विचार करीत असे.

सामायिक करा
लूक 2 वाचा

लूक 2:15-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

देवदूत स्वर्गात गेल्यानंतर मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, “चला, आपण बेथलेहेम येथे जाऊ या. प्रभूने आपल्याला जी गोष्ट सांगितली आहे, ती प्रत्यक्ष पाहू या.” म्हणून ते त्वरेने निघाले व मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक हे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे सांगण्यात आले होते, ते त्यांनी मरिया व योसेफ ह्यांना सांगितले. मेंढपाळांनी सांगितलेल्या वृत्तान्तावरून ऐकणारे सर्व जण थक्क झाले. परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टी तिच्या अंतःकरणात ठेवल्या व त्यांवर ती मनन चिंतन करीत राहिली.

सामायिक करा
लूक 2 वाचा