लूक 2:11-14
लूक 2:11-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दावीदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे! तो ख्रिस्त प्रभू आहे. तुमच्यासाठी ही खूण असेल की, बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल. मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, “परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.”
लूक 2:11-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आज दावीदाच्या नगरात तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे; तोच ख्रिस्त प्रभू आहे. त्याची खूण ही आहे: बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निजविलेले असे बालक तुम्हाला सापडेल.” अचानक त्या दूताबरोबर स्वर्गदूतांचा एक मोठा समूह त्यांना दिसला, ते परमेश्वराची स्तुती करीत म्हणाले, “सर्वोच्च स्वर्गामध्ये परमेश्वराला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी झाली आहे, त्यांना शांती असो.”
लूक 2:11-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल.” इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.”
लूक 2:11-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुमच्यासाठी आज दावीदच्या नगरात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे! तुम्हांला खूण ही की, बाळंत्यांत गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले बालक तुम्हांला आढळेल.” इतक्यात स्वर्गीय समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले, “स्वर्गात देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याची ज्यांच्यावर कृपा झाली आहे, त्यांना शांती.”