लूक 18:38-42
लूक 18:38-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.” जे पुढे चालले होते त्यांनी त्यास शांत राहण्यास सांगितले. पण तो अजून मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!” येशू थांबला आणि त्याने आंधळ्याला स्वतःकडे आणण्याची आज्ञा केली, तो आंधळा जवळ आल्यावर येशूने त्यास विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी.” येशू त्यास म्हणाला, “तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला चांगले केले आहे.”
लूक 18:38-42 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो मोठ्याने ओरडला, “अहो येशू, दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” येशूंच्या पुढे चाललेल्या गर्दीतील लोकांनी त्याला धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, पण तो उलट अधिक मोठमोठ्याने ओरडतच राहिला, “अहो दावीदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” येशू थांबले आणि त्या मनुष्याला त्यांच्याकडे आणण्यास सांगितले. जेव्हा तो आंधळा जवळ आला, येशूंनी त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” “प्रभू मला दृष्टी यावी.” त्याने उत्तर दिले. यावर येशू म्हणाले, “ठीक आहे, तुला दृष्टी दिली आहे. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
लूक 18:38-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणार्यांनी त्याला दटावले; तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी.” येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी येवो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
लूक 18:38-42 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले. तरीही तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दावीदपुत्र येशू, माझ्यावर दया करा.” तेव्हा येशूने उभे राहून त्याला स्वतःकडे आणण्याचा आदेश दिला. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी मिळावी.” येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी मिळो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”