लूक 16:9-11
लूक 16:9-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुम्हास सांगतो, तुमच्यासाठी, तुमच्या अनीतीच्या धनाने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा हे धन संपेल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे एखाद्यावर थोडासा विश्वास टाकणे शक्य असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास टाकणे शक्य आहे व जो कोणी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी आहे तो जास्त गोष्टींविषयी अन्यायी राहील. म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या धनाविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील?
लूक 16:9-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जगातील संपत्ती आपल्याला मित्र मिळविण्यासाठी वापरा म्हणजे ज्यावेळेस ती नाहीशी होईल तेव्हा तुम्हाला सार्वकालिक घरामध्ये निश्चितपणे प्रवेश मिळेल. “जर तुम्ही अगदी लहान गोष्टींत विश्वासू राहिला तर पुष्कळ गोष्टींत विश्वासू असाल, जर कोणी अगदी लहान गोष्टीत अप्रामाणिक राहिला तर पुष्कळ गोष्टीत अप्रामाणिक असेल. तुम्ही जगीक संपत्ती हाताळण्यासंबधी प्रामाणिक नसाल, तर खरी संपत्ती कोण तुम्हाला सोपवून देईल?
लूक 16:9-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा; ह्यासाठी की, ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांला सार्वकालिक वस्तीत घ्यावे. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाहीत तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल?
लूक 16:9-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणखी मी तुम्हांला सांगतो, अनीतिकारक धन नाहीसे होईल तेव्हा शाश्वत निवासस्थानी तुमचे स्वागत व्हावे म्हणून तुम्ही आपणासाठी अनीतिकारक धनाने मित्र जोडा. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू आहे तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे आणि जो अगदी थोडक्याविषयी अप्रामाणिक आहे तो पुष्कळाविषयीही अप्रामाणिक आहे. म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही, तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल?