लूक 15:3-10
लूक 15:3-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग त्याने त्यांना हा दाखला सांगितला : “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यांतून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यांवर घेतो; आणि घरी येऊन मित्रांना व शेजार्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणार्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो. तसेच अशी कोण स्त्री आहे की, तिच्याजवळ रुप्याची दहा नाणी असता त्यांतून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ त्याप्रमाणे, पश्चात्ताप करणार्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.”
लूक 15:3-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग येशूने त्यांनाही दाखला सांगितला. “तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानात सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय? आणि जेव्हा त्यास ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो. आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र करून म्हणतो, माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे. त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो. किंवा एका स्त्रीकडे चांदीची दहा नाणी आहेत आणि जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय? आणि तिला जेव्हा ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे. त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो.”
लूक 15:3-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यावेळी येशूंनी त्यांना हा दाखला सांगितला: “समजा, एकाजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यातून एक हरवले, तर नव्याण्णव रानात सोडून हरवलेले मेंढरू सापडेपर्यंत त्याला शोधणार नाही काय? ते सापडल्यावर तो त्याला आनंदाने आपल्या खांद्यावर उचलून घेईल आणि घरी येईल. आपल्या मित्रांना आणि शेजार्यांना बोलावून म्हणेल, ‘मजबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे.’ त्याचप्रमाणे मी सांगतो की ज्या नव्याण्णव नीतिमान लोकांना पश्चात्तापाची गरज नाही, त्यांच्यापेक्षा पश्चात्ताप करणार्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होतो. “एका स्त्री जवळ चांदीची दहा नाणी असून त्यातले एक हरवले, तर दिवा लावून, घर झाडून ते सापडेपर्यंत त्याचा शोध करणार नाही काय? ते तिला सापडल्यावर, आपल्या मैत्रिणींना आणि शेजार्यांना बोलावून म्हणते, ‘माझ्याबरोबर आनंद करा, कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे.’ त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चात्ताप करणार्या एका पाप्याबद्दल परमेश्वराच्या दूतांच्या समक्षतेत आनंद केला जातो.”
लूक 15:3-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तेव्हा त्याने त्यांना हा दाखला सांगितला: “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यांतून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध घेत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यांवर घेतो. घरी येऊन मित्रांना व शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, ‘माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही, अशा नव्याण्णव नीतिमान लोकांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो. तसेच अशी कोण स्त्री आहे की, जिच्याजवळ दहा चांदीची नाणी असता त्यांतून एक हरवले तर दिवा पेटवून व घर झाडून ते सापडेपर्यंत ती काळजीपूर्वक शोध घेत राहत नाही? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारणींना बोलावून म्हणते, ‘माझे हरवलेले नाणे मला सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा.’ त्याचप्रमाणे, पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद केला जातो, हे मी तुम्हांला सांगतो.”