YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 14:7-14

लूक 14:7-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर, आमंत्रित पाहुणे स्वतःसाठी मानाच्या जागा कसे निवडून घेत होते हे पाहून, त्याने त्यांना एक दाखला सांगितला, तो म्हणाला, “जेव्हा एखादा तुम्हास लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या मनुष्यास त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल. मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हास म्हणेल, या मनुष्यास तुझी जागा दे. मग अपमानित होऊन तुम्हास खालच्या जागी बसावे लागेल. पण जेव्हा तुम्हास आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हास म्हणेल, मित्रा, वरच्या आसनावर येऊन बस. तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.” मग ज्याने आमंत्रण दिले होते त्यास तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, तुझ्या नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”

सामायिक करा
लूक 14 वाचा

लूक 14:7-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

पाहुणे पंक्तीत मानाच्या जागा पटकावण्याच्या खटपटीत असलेले पाहून त्यांनी त्यास दाखला सांगितला “तुम्हाला कोणी लग्नाच्या मेजवानीस आमंत्रण दिले, तर मानाची जागा घेऊ नका, कारण तुमच्यापेक्षा अधिक आदरणीय व्यक्तीस आमंत्रण दिले असेल तर आमंत्रण देणारा, ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हाला म्हणेल, ‘या गृहस्थांना या जागेवर बसू द्या.’ तेव्हा तुमचा अपमान होईल व कमी प्रतीच्या जागेवर जाऊन बसावे लागेल. परंतु जेव्हा तुम्हाला आमंत्रण दिलेले असेल तर खालच्या जागेवर जाऊन बसा, म्हणजे जेव्हा तुमचा यजमान येतो, तो तुम्हाला म्हणेल, ‘मित्रा, चांगल्या जागेवर ये.’ तेव्हा दुसर्‍या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये तुमचा सन्मान होईल. कारण जे सर्व स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील.” नंतर येशू यजमानास म्हणाले, “जेव्हा तुम्ही दुपारी व संध्याकाळी मेजवानी देता, त्यावेळी तुमचे मित्र, भाऊ किंवा बहीण, नातेवाईक आणि श्रीमंत शेजारी यांना आमंत्रण देऊ नका, जर तुम्ही तसे कराल तर ते तुमच्या आमंत्रणाची परतफेड करतील. तुम्ही मेजवानी देता, तेव्हा गोरगरीब, लुळेपांगळे आणि आंधळे अशांना आमंत्रण द्या. म्हणजे नीतिमानांच्या पुनरुत्थानासमयी, ज्यांना परतफेड करता येत नाही, अशा लोकांना दिल्याबद्दल तुम्हाला आशीर्वाद दिला जाईल.”

सामायिक करा
लूक 14 वाचा

लूक 14:7-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसने कशी निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, “कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस; कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल; मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘ह्यांना जागा दे’; तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. पण तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बस; म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘मित्रा, वर येऊन बस’; म्हणजे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल; व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.” मग ज्याने त्याला आमंत्रण केले होते त्यालाही तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल तेव्हा तुम्ही आपले मित्र, आपले भाऊ, आपले नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका; कारण तेही कदाचित तुम्हांला उलट आमंत्रण करतील व तुमची फेड होईल. तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, अपंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा; म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यास त्यांच्याजवळ काही नाही; तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.”

सामायिक करा
लूक 14 वाचा

लूक 14:7-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आमंत्रित लोक मानाची आसने कशी निवडून घेत आहेत, हे पाहून येशू दाखला देऊन म्हणाला, “कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले, तर मानाच्या आसनावर बसू नकोस. तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असण्याची शक्यता आहे. ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘ह्यांना जागा दे’, त्या वेळी तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. उलट, तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर बस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘मित्रा, वर येऊन बस.’ अशा प्रकारे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल; कारण जो कोणी स्वतःला मोठा समजेल तो नमवला जाईल व जो स्वतः नम्र राहील, त्याचा सन्मान केला जाईल.” त्यानंतर ज्याने त्याला आमंत्रण केले होते, त्यालादेखील येशू म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल, तेव्हा तुम्ही तुमचे मित्र, भाऊ, नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका कारण तेही कदाचित तुम्हांला आमंत्रण करतील व तुमची फेड होईल. परंतु तुम्ही मेजवानी द्याल, तेव्हा गरीब, लुळे, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण द्या म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करायला त्यांच्याजवळ काही नसेल. अर्थात, नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची परतफेड होईल.”

सामायिक करा
लूक 14 वाचा