YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 14:27-33

लूक 14:27-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही. जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय? नाही तर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील, या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही! किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का? की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्यास त्याचा सामना करता येणे शक्य आहे काय? जर तो त्यास तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील. त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही.

सामायिक करा
लूक 14 वाचा

लूक 14:27-33 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्याचप्रमाणे जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. “समजा कोणा एकास बुरूज बांधावयाचा असेल, तर प्रथम बसून खर्चाचा नीट अंदाज करून व तो पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे आहे की नाही याचा अंदाज घेत नाही का? कारण जर तुम्ही पाया घातला आणि नंतर जर तो पूर्ण करण्यास समर्थ झाला नाही, तर ते पाहून प्रत्येकजण त्याची थट्टा करतील. म्हणतील, ‘या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली खरी, पण तो पूर्ण करू शकला नाही.’ “किंवा असा कोण राजा आहे की जो दुसर्‍या राजाच्या विरुद्ध युद्धास जाणार आहे. तो बसून विचार करणार नाही का, की जो वीस हजार सैनिक घेऊन येत आहे त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी त्याला दहा हजारांना घेऊन जाणे शक्य होईल का? जर त्याला हे शक्य नसेल, तर शत्रू दूर आहे तेव्हाच शांतीच्या प्रस्तावाचे बोलणे करण्यासाठी प्रतिनिधी मंडळ पाठवील. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याजवळ आहे त्या सर्व गोष्टींचा त्याग करीत नाही तर तुम्हाला माझा शिष्य होता येणार नाही.

सामायिक करा
लूक 14 वाचा

लूक 14:27-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’ अथवा असा कोण राजा आहे की तो दुसर्‍या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, ‘जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय?’ जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलांना पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही.

सामायिक करा
लूक 14 वाचा

लूक 14:27-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला बुरूज बांधायची इच्छा असता, तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज घेऊन आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही, हे पाहत नाही? अन्यथा पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही, तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’ अथवा असा कोण राजा आहे की, तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, जो वीस हजारांचे सैन्य घेऊन माझ्यावर चाल करून येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय? जर जाता येत नसेल, तर तो दूर आहे तोच तो प्रतिनिधींना पाठवून सलोख्याचे बोलणे करील. त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही.

सामायिक करा
लूक 14 वाचा