लूक 14:17-20
लूक 14:17-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि जेवणाच्या वेळेस, ‘आता या, तयारी झाली आहे,’ असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवले. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासायला जातो; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे, म्हणून माझे येणे होत नाही.’
लूक 14:17-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या कारण सर्व तयार आहे’ असा निरोप सांगण्यासाठी नोकराला पाठवले. ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्यास म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपाकरून मला क्षमा कर.’ दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्यांची पारख करण्यासाठी मी चाललो आहे, कृपाकरून मला क्षमा कर.’ आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’
लूक 14:17-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मेजवानीच्या वेळेला त्याने त्याच्या दासांना ज्यांना आमंत्रणे दिली होती त्यांना, ‘चला आता भोजनाची सर्व तयारी झाली आहे’ असे सांगण्यास पाठविले. “परंतु ते प्रत्येकजण सबबी सांगू लागले. पहिला म्हणाला, ‘मी नुकतेच शेत विकत घेतले आहे आणि ते मला जाऊन पहिले पाहिजे, म्हणून मला माफ करा.’ “दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, मी त्यांची तपासणी करावयास जातो, म्हणून क्षमा असावी.’ “तिसरा म्हणाला, ‘माझा नुकताच विवाह झाला आहे म्हणून मी येऊ शकत नाही.’
लूक 14:17-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जेवणाच्या वेळेस, ‘आता या, तयारी झाली आहे’, असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवले. ते सगळे निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे. ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत. त्या मी तपासायला जातो, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे म्हणून मला येता येणार नाही.’